Translate :

Sponsored

Ahmedabad Plane Crash, Medical Collage Students Experience : आम्ही जेवत होतो, आणि अचानक धुळीचे लोट दिसले आणि होत्याचे नव्हते झाले…

Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत विमानातील प्रवाश्यांसह विमान ज्या ठिकाणी पडले त्या इमारतीतील लोकांचाही मृत्यू झाला आहे. हे सर्वजण मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी होते. बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात विमानाचा पुढचा भाग कोसळला होता. 

अहमदाबाद : 2025-06-13

अहमदाबाद विमान दुर्घटा (Ahmedabad Plane Crash) घडली त्यावेळी फ्लाईट एआय 17 अहमदाबादमधील मेघानी येथील नागरी वसाहतीत कोसळले. ज्या इमारतीवर हे विमान कोसळले ती वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाची इमारत होता. या इमारतीत विमानाचा पुढचा भाग कोसळला. त्यामुळे तब्बल 24 भावी डॉक्टरांचा जागीच अंत झाला. तर अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. ज्या भागात हे विमान घुसले तेथे विद्यार्थ्यांची जेवणाची खोली होती. अनेकजण त्यावेळी जेवत होते. अचानक झालेल्या या अपघाताने एकच गोंधळ उडाला. 

जे विद्यार्थ्यी वाचले ते , हेच म्हणत आहेत, की आम्ही नशिबवान आहोत, की आम्ही या अपघातातून वाचलो. जेव्हा हे सर्व झाले, तेव्हा काय होत आहे हेच समजले नाही. प्रथम सर्वांना वाटले की, सिलेंडरचा स्फोट झाला आहे. काहीच समजच नव्हते. आमचे अनेक मित्र यात अडकले होते. जसे शक्य होते तशी आम्ही त्यांना मदत केली. विमानात्या अवशेषांतून, ढिगाऱ्यातून काढून त्यांना उपचारासाठी नेले, जे मृत झाले ते आमचे मित्र होते. अशी आपबीती या विद्यार्थ्यांनी सांगितली आहे. 

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored