Translate :

Sponsored

Ahilyanagar Leopard Attacks, Important Update : अहिल्यानगरमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे शाळांचे वेळापत्रक बिघडले, शाळेत घेण्यात येणार सुरक्षिततेचे धडे : School time Changed Due To leopard Attacks Ahilyanagar

बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शाळांच्या वेळापत्रकांत बदल करण्यात येणार आहे.

Ahilyanagar Leopard Attacks : अहिल्यानगरमध्ये वाढलेल्या बिबट्यांचे हल्ले शाळांच्या वेळेतील बदलांसाठी कारणीभूत ठरत आहेत. येथील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

अहिल्यानगर : 20/11/2025

अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये बिबट्याने (Ahilyanagar Leopard Attacks) हाहाकार केला आहे. तेथील नागरिक जीव मुठीत धरून दिवस घालवत आहेत. पण याचा मोठा परिणाम स्थानिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कारण बिबट्याच्या भीतीमुळे स्थानिक पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे टाळत आहेत. कारण शाळकरी विद्यार्थ्यांवर बिबट्याचा हल्ला होण्याच्या प्रमाणातही वाढ दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिक्षणाचा खेळखंडोबा होताना दिसत आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन स्थानिक शाळांच्या वेळांमध्ये बदल केला आहे.

कसे असणार शाळांचे वेळापत्रक  (Ahilyanagar Leopard Attacks)

बिबट्याचे भ्रमण असणाऱ्या भागांमध्ये शाळा सकाळी 9 वाजता भरवण्यात येणार आहेत तर सायंकाळी 4 वाजेपर्यंत या शाळा सुटणार आहेत. शाळा जास्त लवकर आणि ना उशीरा चालवता, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेण्यात आली आहे. सर्व व्यवस्थापनाच्या शाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने या जाहीर वेळांमध्ये भरवण्यात तसेच सोडण्यात येतील. तसेच विद्यार्थ्यांना परिपाठात सुरक्षिततेविषयी ज्ञान देण्यात येणार आहे.

तसेच शाळांमध्ये पालक मेळावे आयोजित करून पालकांना या काळातील त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव त्यांना करून देण्यात येणार आहे. आपला विद्यार्थी शाळेत सुखरूप पोहचला की नाही याची खात्री पालकांनी करणे पालकांची जबाबदारी आहे तर आपला विद्यार्थी शाळा सुटल्यावर त्याच्या घरी नीट पोहचला की नाही याची शहानिशा करणे प्रत्येक वर्गशिक्षकाचे कर्तव्य आहे.

शिक्षणअधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत आदेश (Ahilyanagar Leopard Attacks)

आपल्या विभागातील किती शाळांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे ? याची संपूर्ण माहिती स्थानिक शिक्षणाधिकाऱ्याला त्वरित देण्याचे आदेश काढण्यात आले आहे आणि प्रत्येक शाळेने, शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी स्थानिक शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करावे अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. नुकतेच जिल्ह्यात दोन लहान मुलांवर बिबट्याने हल्ला केला होता आणि त्यात दोघांचा मृत्यू झाला. बिबट्यांचे हे प्रमाण पारनेर तसेच अहिल्यानगर तालुक्यांमध्ये वाढत जात आहे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored