Asim Sarode News : पुण्यातील सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने सोमवारी हा निर्णय घेतला. याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेऊ.
पुणे : 03/11/2025
पुण्यातील सुप्रसिदध कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे (Asim Sarode news) यांचा कायदेशीर परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने सोमवारी हा निर्णय घेतला. ॲडव्होकेट विविकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हे निर्देश दिले आहेत. असीम सरोदे यांनी सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांबाबत केलेले आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचा परिणाम म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. असीम सरोदे हे सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत झालेल्या सुनावणीत सहभागी झालेल्या वकिलांपैकी एक आहेत. मात्र आता त्यांची सनद रद्द झाल्याने त्यांना न्यायलयात युक्तिवाद करता येणार नाही. याबाबत ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी अद्याप या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेला नाही.
असीम सरोदेंचे विधानं (Asim Sarode news)
माजी ॲडव्होकेट असीम सरोदेंनी न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांबाबत एका सार्वजनिक कार्यक्रमात काही वादग्रस्त विधाने केली होती. त्यांच्या विधानांमुळे न्यायव्यवस्थेचा अपमान झाला आणि न्यायालयांमध्ये अविश्वास निर्माण झाला, अशी तक्रार एका तक्रारदाराने केली होती. असीम सरोदेंचे विधान अशोभनीय , बेजबाबदार आणि बदनामीकारक असल्याचे नमूद करून बार कौन्सिलकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारदाराने 19 मार्च 2024 रोजी सरोदेंनी लेखी माफी मागण्याची संधी दिली, पण त्यांनी ती नाकारली. त्यामुळे आता त्यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे.
ॲडव्होकेट विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने असीम सरोदे (Asim Sarode news) यांच्या भाषणाचे ट्रान्सक्रिप्ट आणि व्हिडिओ क्लिप्स पाहिले. व्हिडिओमध्ये असीम सरोदे स्पष्टपणे असे म्हणत आहे की, “राज्यपाल निरूपयोगी आहेत”, आणि न्यायालय सरकारच्या दबावाखाली आहे. अशा कायद्यामुळे नागरिकांमध्ये न्यायालयांमध्ये अविश्वास निर्माण होतो. न्यायव्यवस्था आणि संवैधानिक पदाचा आदर करणे ही वकिलाची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. वकिल हा ” न्यायालयाचा अधिकारी ” असल्याने त्याने संयम आणि न्यायव्यवस्थेचा आदर राखला पाहिजे, असे बार कौन्सिल समितीने म्हटले आहे.
असीम सरोदे काय म्हणाले होते ? (Asim Sarode news)
मी कोणत्याही प्रकारे न्यायालयाचा किंवा संविधानिक पदाचा अपमान केला नाही. माझे वक्तव्य हे लोकशाहीतील रचनात्मक टीका होती. फालतू हा शब्द मी अपमानार्थ नव्हे, तर सर्वसामान्य भाषेत वापरला होता. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे. माझा हेतू न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्याचा नव्हता, तर लोकांना जागरूक करण्याचा होता, असे स्पष्टिकरण असीम सरोदे यांनी दिले होते.