X

Translate :

Sponsored

Adhik Maas : अधिक मास  (2023) म्हणजे काय ?  त्याचे धार्मिक महत्त्व.

अरे या वर्षी दरवर्षी पेक्षा गणपती उशिरा आहेत, किंवा या वर्षी ऑक्टोबर नाही तर नोव्हेंबर मध्ये दिवाळी आली आहे.. कारण यावर्षी अधिक मास आहे ना.. असे संवाद अनेकदा आपण ऐकत असतो. पण नक्की अधिक मास (Adhik maas) म्हणजे काय ? हे ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठीच ही माहिती आहे.

खरं तर हिंदू धर्मात तीन वर्षातून एकदा येणाऱ्या ‘अधिक मासा’ला (Adhik Mass)  धार्मिक महत्त्व खुप आहे. या महिन्याभराच्या काळात अनेक व्रत वैकल्य, दान धर्म केला जातो. अनेकजण या काळात महिनाभराचे काही नियम करून ते भक्तीभावाने पाळतात. मात्र अनेकांना हा अधिक मास  (Adhik Maas) किंवा महिना म्हणजे काय हे समजत नाही. इंग्रजी कॅलेंडरनुसार तर आपल्याला १२ महिन्यांची नावे माहित असतात. अगदी मराठी महिन्यांचीही नावे माहित असतात पण अधिक मासाचे (Adhik Maas) गणित अनेकदा समजत नाही. आजच्या ‘मिसलेनियस भारत’च्या या लेखात आपण अधिक मासाचे धार्मिक महत्त्व आणि हा अधिक मास (Adhik Maas) कसा गणला जातो याची शास्रीय माहिती घेणार आहोत.

अधिक मास (Adhik Maas)म्हणजे काय ? 

अधिक मासाला फक्त धार्मिक महतत्त्वच नाहिये. तर त्याला खगोल शास्रीय महत्त्व सुद्धा आहे. आपण दैनंदिन जीवनात जे कॅलेंडर वापरतो ते इंग्रजी वापरतो. त्या कॅलेंडर मध्ये एकुण बारा महिने असतात. म्हणजे हे कॅलेंडर सौर वर्षानुसार वर्षाचे दिवस मोजते. त्या कॅलेंडरप्रमाणे किंवा त्यातील नक्षत्राप्रमाणे सौर वर्षाचे दिवस हे ३६५ असतात. मात्र हेच दिवस आपल्या हिंदू कालगणनेनुसार १२ महिन्यात ३५५ असतात. म्हणजे एक चांद्र वर्षानुसार या दिवसाची गणती होते.

मराठी महिना चैत्रापासून फाल्गूनपर्यंतच्या या १२ महिन्यांच्या कालावधीत हे ३५५ दिवस असतात. म्हणजेच मराठी हिंदू कॅलेंडरमधील ३६५ दिवसातील १० दिवस दर तीन वर्षांमधील ३० दिवस अधिकचे घेऊन हा अधिकचा एक पुर्ण महिना घेऊन, हे दिवस सारखे होतात. त्यालाच आपण अधिक महिना (Adhik Maas) असे म्हणतो.

ज्या महिन्यात सूर्य संक्रात येत नाही, तो अधिक महिना मानला जातो. अधिक महिनाAdhik Maas)  किंवा पुरूषोत्तम मास तीन वर्षांतून एकदा येतो. सौर वर्ष आणि चांद्र वर्षांमधील फरक जोडण्यासाठी या अधिक मासाची गणना करण्याची सोय केली आहे असेही आपण म्हणू शकतो.

अधिक मासात व्रतवैकल्य का केली जातात?

प्रत्येत महिन्यात सूर्य एकेका राशीत संक्रमण करतो. परंतू या अधिकच्या महिन्यात म्हणजेच अधिक महिन्यात सूर्य कोणत्याही राशीत संक्रमण करीत नाही. म्हणजेच अधिकमासात (Adhik Maas) सूर्य संक्रात नसते. त्यामुळे चंद्र सूर्याच्या गतीत फरक पडतो आणि वातावरणातही ग्रहणकालाप्रमाणे बदल होत असतात.

या बदलत्या अनिष्ट वातावरणाचा आपल्या प्रकृतीवर परिणाम होऊ नये म्हणून या महिन्यात व्रते आणि पुण्यकारक कृत्ये करावीत असे शास्रकारांनी सांगितले आहे. पूर्वी या महिन्याला ‘मलमास’ (Adhik Maas) असेही म्हणायचे. या महिन्याला भगवान विष्णू आणि भगवान कृष्ण यांच्याशी अनेक कथांनुसार जोडले गेल्यामुळे या महिन्याला पुरूषोत्तम मास असेही म्हणतात. अधिक महिन्यात विशेष कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, मात्र दान-धर्म करण्याला खुप महत्त्व दिले गेले आहे.

पुरूषोत्तम मास आणि तिथींचे महत्त्व –

आपण भारतीय वर्षभर अनेक सण साजरे करत असतो. हे सर्व सण ठराविक काळात म्हणजे ठराविक ऋतूंमध्येच यावेत म्हणूनही आपल्याकडे हे चांद्र-सौर पद्धतींप्रमाणे कालगणना केली जाते. एका चांद्रवर्षात ३६० तिथी येतात. एका सौरवर्षात ३७१ तिथी येतात. म्हणजेच दरवर्षी ११ तिथी वाढत जाऊन त्या ३३ होतात आणि मग दर तीन वर्षांनी अधिक मास (Adhik Maas) येतो.


अधिक मासाला धोंडा मास म्हणतात कारण.

अधिक मासात खगोल शास्रीय ज्ञानानुसार सूर्यसंक्रात नसते. सुर्यसंक्रात म्हणजे याकाळात सूर्य एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करत नाही. त्यामुळे या महिन्याला मल मास (Adhik Maas) म्हणतात. या महिन्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नाहित, त्यामुळे त्यासाठीचा हा व्यर्थ महिना म्हणून हा धोंडा मास किंवा धोंड्याचा महिना.

कोणत्या महिन्यात येतो अधिक मास ?

चैत्र ते अश्विन या सात मासांपैकी एक मास ‘अधिक मास’ म्हणून येतो. क्वचित फाल्गून मासातही अधिक मास (Adhik Maas) येतो.

कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष या मासांना जोडून अधिक मास येत नाही.

अधिक मासात करण्यात येणारी व्रते –

अधिकमासात (Adhik Maas) अनेकजण महिनाभर एकवेळ जेवण.  करून उपवास करतात. यालाच एकभुक्त म्हणतात. नक्तभोजन दिवसा न जेवता रात्रीच्या वेळी एकदाच जेवणे.

संपूर्ण मासात दान करणे.

संपूर्म मासात श्रीकृष्णाची पूजा, जप करणे.

प्रतिदिन एकच वेळ भोजन करावे. जेवतांना बोलू नये.

तीर्थस्नान केले जाते.

दीपदान केले जाते. देवापुढे अखंड दिवा लावला जातो.

महिनाभर गोपूजन करून, गोग्रोस घातला जातो.

अनारशांचे दान दिले जाते.

अधिक महिन्यात जावयाला धोंड्याचे वाण का देतात ?

अधिक महिना (Adhik Maas)  हा भगवान विष्णूच्या भक्तीचा महिना म्हणून ओळखला जातो. आणि हिंदू संस्कृतीत मुलगी आणि जावयाला लक्ष्मी-नारायणाचा जोडा समजतात. त्यामुळे भगवान विष्णूचे रूप समजून या मासात जावयाला आपल्या क्षमतेप्रमाणे चांदीचे दिपदान आणि अनारसाचे वाण देण्याची प्रथा आहे. हे अनारसे अथवा बत्तासेचे वाण ३३ या संख्येत दिले जाते कारण हा अधिक महिना ३३ दिवसांचा असतो. खरं तर सोन्या-चांदिच्या वस्तू देणे हे महत्त्वाचे नसून आपल्या देशात, संस्कृतीत मुलगी जावयाला प्रेम, महत्त्व देण्याची ही एक प्रथा आहे. तिचा योग्य आदर करतच हि प्रथा पार पाडायला हवी. त्यातील भेटवस्तूंचा अट्टाहास होता कामा नये हे निश्चित.

अधिकमासातील दीपदानाचे महत्त्व.

भगवान विष्णूच्या आराधनेसाठी आणि आशिवार्दासाठी दीपदानाला महत्त्व आहे. लक्ष्मीमातेला चांदी हा धातू प्रिय असल्यामुळे शक्यतो चांदीच्या दिव्याचे दान केले जाते.

( वरील सर्व माहिती ही आपल्या परंपरा, संस्कृतीमध्ये पूर्वापार चालत आलेल्या आहे, त्याची माहिती मिसलेनियस भारतच्या माध्यमातून दिलेली आहे. त्याविषयी कोणताही दावा आम्ही करत नाही. 

ज्योती भालेराव !

This post was last modified on July 30, 2023 6:09 pm

Sponsored
Jyoti Bhalerao:

View Comments (2)

  • Hi my loved one I wish to say that this post is amazing nice written and include approximately all vital infos Id like to peer more posts like this

Sponsored

This website uses cookies.

Sponsored