Actor Dharmendra Death : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे आज सकाळी 9:30 वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर विर्लेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
मुंबई : 24/11/2025
जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Actor Dharmendra Death) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी आपली कर्मभूमी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. नव्वदाव्या वाढदिवसाच्या अवघ्या काही दिवस आधी धर्मेंद्र यांचे निधन झाल्याने, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. येत्या 8 डिसेंबरला त्यांचा 90 वा वाढदिवस होता. नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रूग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. आज (24 नोव्हेंबर) सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर दुपारी 12:30 वाजता त्यांचं पार्थिव विर्लेपार्ले इथल्या स्मशानभूमीवर आणण्यात आले. देओल कुटुंबियांसह स्मशानभूमीवर अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि आमिर खानसुद्धा पोहोचले आहेत.
धर्मेंद्र हे बॉलिवूड मधील त्याकाळातील सर्वात हॅन्डसम हिरो म्हणून ओळखले जात होते. ‘हि मॅन’ ही उपाधी त्यांनी आयुष्यभर मिरवली. गेल्या सहा दशकाहून अधिक काळ ते इंडस्ट्रीत कार्यरत होते. त्यांचा ‘इक्कीस’ हा शेवटचा चित्रपट येत्या 25 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून धर्मेंद्र ओळखले जातात.
धर्मेंद्र यांचा परिचय आणि कारकिर्द (Actor Dharmendra Death)
अभिनेते धर्मेंद्र यांचे पूर्ण नाव धर्म सिंह देओल असे आहे. त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 ला झाला. भारतीय अभिनेता, निर्माता आणि राजकीय व्यक्ती म्हणूनही त्यांनी आपली कारकिर्द गाजवली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या चित्रपटातील योगदानासाठी त्यांना 1997 मध्ये फिल्मफेयरचा मानाचा लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कारने गौरविण्यात आले. भारताच्या 15 व्या लोकसभेचे ते सदस्य राहीले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून राजस्थानच्या बीकानेरचे चे प्रतिनीधी म्हणून निवडले गेले होते. 2012 मध्ये त्यांनी भारताच्या तीसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना पद्म भूषण पुरस्कार मिळाला होता.
धर्मेंद्र यांचे उल्लेखनीय चित्रपट (Actor Dharmendra Death)
सुरत और सीरत (1962), बंदिनी (1963), दिल ने फिर याद किया (1966), सीता और गीता, शोले, चरस, आजाद, कातिलों के कातिल, पत्थर ओर पायल, फूल और पत्थर, बहरिन फिर भी आयेगी, साथ. रेशन की डोर, लडकी हूं, काजल, पौर्णिमा, बहारों की मंजिल, चंदन का पालना , अनुपमा, आयी मिलन की बेला, आया सावन झुमके, मेरे हमदम मेरे दोस्त, इश्क पर जोर नही, कब, क्यु और कहा अशा असंख्य चित्रपटांमध्ये काम केले.
अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनामुळे अवघ्या मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.