भारतासारख्या विस्तिर्ण आणि विविधतेने नटलेल्या देशातील प्रत्येक राज्यात, त्यातील प्रत्येक शहरं, ग्रामीण भागात काहीना काही तरी ऐतिहासिक वारसास्थळं, पौराणिक मंदिरं, विशिष्ट उद्यानं अशी अनेक पर्यटन स्थळ आहेत. काही पर्यटन स्थळं ही त्या शहराची, गावाची ओळख आहेत, तर काही स्थळांना ऐतिहासिक महत्त्व तर आहे, मात्र काळाच्या ओघात त्याच्या खुणा धुसर झाल्या असल्या तरी जनमाणसात अशा स्थळांसाठीचं एक भावनिक नातं आहे. अशाच परिचित,अपरिचित पर्यटन स्थळांना मी माझ्या कॅमेरा आणि शब्दातून मांडणार आहे ते मिसलेनियस भारत या ब्लॉगच्या माध्यमातून.
यातील काही पर्यटनस्थळ हे अनेकांना परिचित असतील तर काहींची ओळख वाचकांना नव्याने असू शकते. परिचित असणाऱ्या ठिकाणांविषयी काही वेगळी माहिती आणि छायाचित्र देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. तर काही शहरांमधील आगळ्यावेगळ्या पण फारशी प्रसिद्धी न मिळालेल्या पर्यटन स्थळांविषयीची माहीती या ब्लॉगच्या माध्यमातून दिली जाईल.