Akola Suicied Case : अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मानसोपचारतज्ञ डॉक्टरांनी विषारी इंजेक्शन घेऊन आपले आयुष्य संपवलं आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.
अकोला : 2025-06-21
अकोल्यामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मानसोपचारतज्ञ डॉक्टरांनी आत्महत्या केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. मानसोपचारतज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी आत्महत्या केली. त्यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आपलं जीवन संपवले. ते अकोल्यामधील सन्मित्र हॉस्पिटलमध्ये नोकरीला होते. त्यांनी आपल्या रहात्या घरी आत्महत्या केली.
काय घडले नक्की ?
मानसोपचारतज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी आपल्या न्यूतापडिया नगर भागातील राहत्या घरी आत्महत्या केली. विषारी इंजेक्शन घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. ते अकोल्यामधील सन्मित्र हॉस्पिटलमध्ये नोकरीला होते. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झाले नाही.
डॉ.प्रशांत जावरकर यांनी अकोल्यामधील अनेकांना समुपदेशन करून ताणवमुक्त केले. मात्र आज त्यांनीच आत्महत्या केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.