Translate :

Sponsored

71th Natioanal Film Awards : 71 वे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; 33 वर्षांच्या करियरमध्ये शाहरूख खानने स्विकारला पहिला राष्ट्रीय पुरस्कार; जाणून घ्या इतर मानकऱ्यांची नावे..

71th Natioanal Film Awards

71th Natioanal Film Awards : देशात मानाचे समजले जाणारे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. यावर्षी 71 वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. शाहरूख खानला आपल्या 33 वर्षांच्या करियरमध्ये पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे. याशिवाय कोण आहेत बाकीचे प्रतिभावान कलाकार जाणून घ्या.

दिल्ली : 23/09/2025

71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे (71th Natioanal Film Awards)  वितरण आज 23 सप्टेंबर ला नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. हे पुरस्कार 2023 या वर्षात प्रदर्शित झालेल्या पुरस्कारांना देण्यात आले आहेत. चित्रपट, लघुपट आणि इतर चित्रपट विषयक श्रेणीत हे पुरस्कार देण्यात आले आहेत. यावर्षीच्या पुरस्कार्थींमधील विशेष बाब म्हणजे, बॉलिवडच्या बादशहा शाहरूख खानला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार होय. त्यांना हा पुरस्कार ‘जवान’ या चित्रपटासाठी घोषीत करण्यात आला आहे. हे सर्व पुरस्कार 1 ऑगस्टला जाहीर करण्यात आले होते. शाहरूख खानसह प्रसिद्ध अभिनेता विक्रांत मेस्सी यांना ’12th फेल’ साठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

विज्ञान भवनात पार पडला सोहळा  (71th Natioanal Film Awards )

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हे पुरस्कार नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे प्रदान करण्यात आले. यावेळी चित्रपट क्षेत्रातील अनेक प्रतिभावन कलाकार उपस्थित होते. विधू विनोद चोप्रा यांच्या 12th फेल या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा पुरस्कार मिळाला, तर ऑफबीट कॉमेडी ‘कटहल-ए जॅकफ्रुट मिस्ट्री’ याला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून सन्मानित करण्यात आले. राणी मुर्खर्जीला ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मनोरंजन क्षेत्रासाठी हे पुरस्कार फार महत्त्वाचे समजले जातात.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची यादी (71th Natioanal Film Awards list )

  • सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी – गॉड वल्चर ॲंड ह्युमन
  • सर्वोत्कृष्ट कल्चर फिल्म – टाईमलेस तमिळनाडू
  • सर्वोत्कृष्ट तमिळ फिल्म – पार्किंग
  • सर्वोत्कृष्ट तेलगु फिल्म – भागावान्थ केसरी
  • सर्वोत्कृष्ट पंजाबी फिल्म – गॉडडे गॉडडे चा
  • सर्वोत्कृष्ट मराठी फिल्म – श्यामची आई
  • सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा – कथल
  • सर्वोत्कृष्ट गुजराती सिनेमा – वश
  • सर्वोत्कृष्ट बंगाली सिनेमा – डीप फ्रिजर
  • सर्वोत्कृष्ट ॲक्शन सिनेमा – हनुमान
  • सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी – वैभवी मर्चंट (रॉकी और रानी की प्रेम कहाणी )
  • सर्वोत्कृष्ट म्युझिक दिग्दर्शक – हर्षवर्धन रामेश्वर ( ॲनिमल सिनेमा)
  • सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन – ॲनिमल
  • सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर – प्रसन्नता मोहपात्रा (द केरला स्टोरी)
  • सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर – फिमेल – शिल्पा राव
  • सर्वोत्कृष्ट मराठी बालकलाकार – कबीर कंढरे ( जिप्सी ) त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकले आणि भार्गव
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – उर्वशी, जानकी बोडीवाला
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता – शाहरूख खान ( जवान), विक्रांत मेस्सी (12th फेल)
  • सर्वोत्कृष्ट लहान मुलांचा सिनेमा – नाळ 2
  • सर्वोत्कृष्ट डेब्यु फिल्म दिग्दर्शक – आशिष भेंडे (आत्मपॅम्फलेट)
  • सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म – 12th फेल

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored